सुनगाव येथे सासू-सासर्‍यांनी केले सुनेचे कन्यादान

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शालिग्राम लक्ष्‍मण वानखडे यांनी केले आपल्या सुनेचे कन्यादान. सुनगाव येथील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाशी 16 मार्च 2020 रोजी धामणगाव तालुका संग्रामपुर येथील राधा रामदास उमाळे या मुलीशी विवाह झाला होता परंतु दुर्दैवाने दोन ते तीन महिन्यातच 31ऑगस्ट 2020 रोजी संतोष शालिग्राम वानखडे याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे राधा ही त्याची पत्नी आपले सासू सासरे सुनगाव यांच्याकडेच राहत होती शालिग्राम लक्ष्‍मण वानखडे सासरे व सासू वत्सलाबाई यांनी राधा हिचा आपल्या मुलीप्रमाणे सात ते आठ महिने सांभाळ केला व काल 5 मार्च 20 21 रोजी राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्‍न राजनकार ह्यांच्याशी सुनगाव येथे नोंदणी पद्धतीने विवाह करून दिला सुनगाव येथे अशा प्रकारचा विवाह म्हणजेच सासू-सासरे यांनी केलेले सुनेचे कन्यादान हे प्रथमच घडलेला विवाह आहे या विवाहासाठी तिचे सासरे यांनी सात ते आठ महिन्यांपासून प्रयत्न केला होता या विवाहात कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह सुनगाव येथे पार पडला अशा या आगळ्यावेगळ्या विवाहाची समाजातील प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी या विवाहाचे सुनगाव येथे सर्वत्र चर्चा होत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल इंगळे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे मीराताई भड पांडुरंग गवई पत्रकार राजकुमार भड महाले मॅडम मनोहर वानखडे उमेश कुर्वाडे अनिल धुळे उपस्थित होते

Leave a Comment