गोंदिया-शैलेश राजनकर
देवरी ते आमगांव सिमेंट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सध्या स्थितीत सुरू आहे. वडेगांव गावाजवळ जुना रस्ता पूर्णता उकडून गेल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण वाढले आहे. मात्र या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या च्या नाकातोंडात दूर जात आहे. रोडालगतच्या घरातील लोकांना धुळीच्या सामना करावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.
या रस्त्यावर मोठ्या वाहनांची रहदारी अधिक प्रमाणात आहे. यामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना समोरून मागून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे एखादे मोठे अपघात घडू शकते या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही. या कारणाने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या रस्त्यावर दिवस रात्र प्रचंड वाहतूक असते. या उखडलेल्या रस्त्यांची काळजी घेणे संबंधित विभागाचे कर्तव्य आहे. मात्र तसे दिसत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रोडा लगतच्या घरातील लोकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या श्वसनाच्या आजारात वाढ होत आहे.
वडेगांव येथे असे धुळीचे चित्र पाहायला मिळत आहे. या रस्त्याचे बांधकाम मंदगतीने सुरू असून याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून मोठ्या प्रमाणात धुळी मुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होणार की नाही याकडे सर्व वडेगांव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.