(तुकाराम राठोड)
जालना-मा.सीईओ मॅडम,यांनी ग्राम पंचायत कार्यालय,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र,आणि जिल्हा परिषद शाळा,विरेगाव येथे आयुष्मान भारत कॅम्पच्या भेटीच्या माध्यमातून भेट देऊन गावातील विविध ठिकाणी पाहणी केली तसेच रेशन पासून थेट रोजच्या दैनंदिन दळणवळणाची चौकशी करत थेट जनतेला विचारणा केली की,रोज पाणीपुरवठा,होतो का? तसेच राशन मिळते का? ग्रामसेवक तलाठी शिक्षक ई.पदाधिकारी वैवस्थित काम करताय का? तसेच रमाई आवास योजनेंतर्गत आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तसेच गायराण जमीन इ. विषयावर जनतेला चौकशी करत संबंधित पदाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत,तसेच आविष्यमान कार्ड विषयी जनतेला जनजागृती केली,आणि सूचना दिल्या की सर्व कामे जबाबदारीने पार केल्या पाहिजे अश्या सूचना दिल्या कर्मचाऱ्यांना,तसेच गावातील बरेचशे रोड खराब आहे.तर प्रपोज केलं का अशी ग्रामपंचायला विचरणा केली. आणि विस्तार अधिकारी,बिडीओ यांना सूचना दिल्या की तत्काळ प्रस्ताव मागणी करून आयोजन करण्यात आले पाहिजे अश्या थेट सूचना दिल्या आहेत.या वेळी गावातील सरपंच अमोलभैय्या जाधव,ग्रामविकास अधिकारी साबळे मॅडम,विस्तार अधिकारी सुर्यवंशी साहेब,डि.एच.ओ.डॉ. खेतगावकर,टि.एच.ओ.सोणी मॅडम,मेडिकल आफिसर डॉ. सूरज राठोड,डॉ.झूकते मॅडम,डॉ. आढावसर,डॉ.मस्के,डॉ.शेक,डॉ. हनवते, डॉ .ए.सी.शिंदे साहेब,डॉ. देशमाने ग्रामसेवक डोईफोडे सर,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत आपरेटर विषाल मोठे,बंडू शिंदे,आशा शेविका गायके,मोठे,अंगणवाडी सेविका,बचत गट महीला,इ ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ, उपस्थित होते.सिईओ मॅडम,यांनी विरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध ठिकाणी भेट देऊन बर्याच ठिकाणी दैनंदिन दळणवळणाचा अभ्यास करून कौतुक ही केले. तसेच बर्याच चूका लक्षात आणून देत पदाधिकार्यांना ठनकाऊन दूरूस्त करण्यास ही सांगितले. असे सरपंच अमोलभैय्या जाधव, यांनी सांगितले.शेवटी अमोलभय्या,यांनी सिईओ मॅडम यांचे आभार मानले आणि विरेगाव ग्रामपंचायत वतिने ग्रामपंचायत कार्यालय येथे शाब्दिक स्वागत करत आभार मानले आणि मॅडम शी विरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत विषयावर चर्चा करताना जिल्ह्यात आपण आपल्या दौऱ्यात पहीले माझे गाव निवडले.आपण गावात येऊन बर्याच विषयावर लक्षवेधी चर्चा केली आपल्या विचारातून भरपूर दिलासादायक विकसित सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा दिसते.आपल्यामध्ये,आम्हाला ही जनहितासाठी काम करायला आवडते मॅडम आम्ही ही मा.आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय.भविष्यात सर्व सहकारी पदाधिकारी ग्रामस्थ यांना सोबत घेऊन सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन दैनंदिन जनहित दैनंदिन दळणवळणाची धैयधोरणे राबविण्यात आम्ही चोखपणे काम करूयात.असे सरपंच अमोलभैय्या जाधव यांनी सांगितले आहे.