प्रतिनिधी:(मुंबई) सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा धक्का बसला आहे.तबल 30 वर्षा सोबत एकनिष्ठ राहिलेले राजेंद्र अंभोरे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,खासदार प्रतापराव जाधव,माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिंदे गटांमध्ये प्रवेश केला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक जी बोरकर,शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख आतिश भाऊ तायडे,सिंदखेडराजा शिवसेना शहर प्रमुख तथा नगरपरिषद सभापती बालाजी मेहत्रे,प्रदीप मेहत्रे,संतोष बर्डे हे प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस ला हा दुसरा धक्का आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप मेहत्रे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे नामदार अतुलजी सावे,आमदार संजय भाऊ कुटे,विनोद भाऊ वाघ,विष्णू भाऊ मेहेत्रे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.