सिंदखेडराजा पंचायत समितीला भ्रष्टाचाराचे ग्रहण ! ४०,हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता संदीप उबाळे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा येथील पंचायत समिती कार्यालय मध्ये अनेक गोरगरीब व्यक्तींचे तसेच शेतकऱ्यांचे कामे निगडित असतात ‘परंतु ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या पंचायत समितीमध्ये अनेक अधिकारी हे लाचेची मागणी गुपचूप पणे करत असतात तर काही व्यक्ती ही त्यांना लाच सुद्धा देऊन आपली कामे भागवतात ‘व यामुळेच पंचायत समितीमधील कर्मचारी अधिकारी वर्ग आहे लाचेच्या एवढ्या आहारी गेले आहेत की छोटे काम सुद्धा करायचे झाल्यास गोरगरीब लोकांना लाचेची मागणी करतात ‘परंतु काही लोक सुज्ञ असतात ‘असाच काहीसा प्रकारदिनांक 23 मार्च ला सिंदखेडराजा पंचायत समितीच्या आवारात घडला ‘तालुक्यातील दुसरबीड येथील एका 55 वर्षीय व्यक्तीने ‘सन 2020 मध्ये सिंदखेड राजा पंचायत समिती अंतर्गत ग्राम वाकद , राहेरी बुद्रुक, . आडगाव राजा, येथील जिल्हापरिषद शाळेच्या बांधकामाचे बील एकूण ‘ २५ लाख ‘ २६हजार रुपये झाले असून त्याचे तीन टक्के प्रमाणे ’70 हजार रुपये लाचेची मागणी पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता ( वर्ग 3 )संदीप उबाळे वय 34 वर्ष .हे दुसरबीड येथील व्यक्तीला करू लागले ‘त्याचप्रमाणे ठरल्याप्रमाणे 40 हजार रुपये पहिला हप्ता देण्याचे .दिनांक 23 मार्च रोजी ठरले ‘त्याप्रमाणं ४० हजार रुपये पंचायत समितीच्या आवारामध्ये देत असताना ‘अगोदरच सापळा रचून बसलेल्या .लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने श्री उबाळे यांना 40 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले ।या लाचलुचपत सापळा पथक का मध्येपोलीस उपाधीक्षक श्री आर .एन .मळघणे ।पोलीस नाईक श्री विलास साखरे ‘रवींद्र दळवी ‘ श्री जगदीश पवार ‘हे होते तर मार्गदर्शन अधिकारी म्हणून ।श्री विशाल गायकवाड ‘पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र ‘श्री अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र ‘श्री संजय चौधरी पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा ।तर तपासणी अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक श्री आर एन मळघणे यांनी काम पाहिले ‘आरोपीवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती ‘

Leave a Comment