सामाजिक तेढ निर्माण करण्याऱ्या ठराव विरोधात उपोषणाची सांगता

 

 

श्याम उमरकर संग्रामपूर  ता. प्रतिनिधी 

संग्रामपूर शहरातील वार्ड क्रमांक 15 मधील गट नंबर 214 मधील ले आऊट मधील ओपन स्पेस च्या जाग्यावर नगर पंचायत च्या मासिक सभा मध्ये दिनांक 25/08/2023 ला शादीखाना किंवा सभागृह बांधकाम करण्यासाठी स्थानिक सत्ताधारी यांनी ठराव पारीत केला. सदर वार्ड क्रमांक 15 मध्ये गट नंबर 14 मध्ये हिंदू व मुस्लिम बांधव आज पर्यन्त गुण्या गोविंदाने राहत सर्व सन उत्सव साजरे करत.

असतांना स्थानिक सत्ताधारी यांनी आपली नागरिकांच्या भावना चा विचार न करता जातीय तेढ निर्माण होण्यासाठीच का येथील ओपन स्पेस मध्ये शादीखाना घेतला का?

याबाबत सतत जनतेत सुर निघत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रथम विनंती करत तो ठराव रद्द करावा याबाबत विनंती केली. परंतु नगर पंचायत चे पदाधिकारी व प्रसाशन याबाबत काही ऐकायला तयार नसल्याने आपला आडेमूठ पणा धरत होते.

शेवटी नागरिकांनी गट नंबर 14 वार्ड क्रमांक 15 मधील ओपन स्पेस वर शादिखाना करू नये यासाठी निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला. तरी पदाधिकारी ऐकत नाही व याबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे दिनांक 12 ऑक्टोबर पासून स्थानिक नगर पंचायत चे भारत बावस्कार व रमेश सोनटक्के यांनी आमरण उपोषण सुरु केले.

उपोषणाला स्थानिक संग्रामपुर शहरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने नगर पंचायत पदाधिकारी यांना उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गट नंबर 214 वार्ड क्रमांक 15 मधील ओपन स्पेस जागेवर शादिखाना सभागृह बाबत उपोषण कर्ते सोबत चर्चा करून येणाऱ्या सभेत सार्वजनिक जागेत प्रस्तावित असलेले सामाजिक सभागृहाचे काम येणाऱ्या नगर पंचायत च्या सभे समोर ठेवून ठराव रद्द करण्यात येईल.

व त्या नुसार वार्ड क्रमांक 15 मधील सामाजिक सभागृहाचे बांधकामाची कोणतेही कार्यवाही यापुढे होणार नाही. तरी आपण आपले उपोषण मागे घ्यावे असे लेखी आश्वासन दिल्याने नगराध्यक्ष उषा सोनोने यांच्या हस्ते लींबू पाणी देऊन भारत बावस्कार व रमेश सोनटक्के यांना आपले उपोषण मागे घेतले.

यावेळी नगर पंचायत चे नगर अध्यक्षा उषाताई सोनोने, बांधकाम अभियंता पारस्कार, नगर पंचायत अधीक्षक शरद कोल्हे, पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment