दानापूर- गोपाल विरघट
येथील साध्वी कालंका माता मंदिरात मातेच्या 21व्या पुण्यतिथी महोत्सव कार्तिक शुद्ध पंचमी दिनांक 29/ 10 ,/2022 शनिवारी ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दि28/10/2022शुक्रवार सायंकाळी 5 वाजता हरीनाम गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली दानापूर,सोगोडा,पळशी,उमरा एकलारा,चांगेफळ, येथील ढोलाचे भजन मंडळ सहभागी झाले होते दिनांक 29/ 10/ 2022 पांडवपंचमी ला मातेच्या समाधीवर विधिवत पूजन करून जलाभिषेक करण्यात आला.दुपारी12 वाजता महंत कृष्णानंदजी भारती महाराज श्री क्षेत्र वारी हनुमान यांच्या प्रवचनाचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.या नतंर देवीची आरती नंतर दहीहंडी काला वाटुन महाप्रसादाला सुरुवात झाली. सायंकाळी उमरा ता अकोट येथील महिला भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याकरिता शारदा माता महिला मंडळ, कालंक माता उत्सव मंडळाचे स्वंयसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक , गणेश मंडळ,दुर्गा माता मंडळ, आदींनी परिश्रम घेतले.हा उत्सव म्हणजे माहेरी आलेल्या लेकीबाईसाठी दिवाळी असतो कारण दिवाळी नंतर पाचव्या दिवशी येणारा हा उत्सव गावातील सर्व लेकीसाठी महत्वाचा उत्सव असतो , त्यामुळे महाप्रसादासाठी त्या आवर्जून उपस्थित राहतात.