सिंदी रेल्वे ता. १० : येथील नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांला वेतनश्रेणी लागू करण्याबाबत दहा हजार पैकी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगरपालिकेचा वरिष्ठ लिपिक प्रकाश चांदेकर याला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता.१०) दुपारी पाच वाजता पालिका कार्यालयात रंगेहाथ अटक केली.
सविस्तर वृत असे की येथील नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांला वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आणि वेतन काढुन देण्यासाठी पालिकेचा लाचखोर वरिष्ठ लिपिक प्रकाश चांदेकर यांने दहा हजाराची लाच मागितली होती. तडजोडी अंती सात हजाराची सोमवारी (ता. ९) लाचेची रक्कम न. प. कार्यालयातच दुपारी पाच दरम्यान स्विकारुन तीन हजार पगारावर देण्याचे ठरले. लाचखोर लिपीकाने आपल्या वैयक्तिक लाभासाठी हि रक्कम घेतली करिता नागपुर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून चांदेकर याला रंगेहाथ अटक केली.
हि कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक मधुकर गीते,पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप जगताप, पोलीस निरीक्षक युनुस शेख , पोलीस अमंलदार भागवत वानखेडे, महेश सेलोकर सचिन किन्हेकर, शारिक अहमद आदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील पथकाने केली.
*पालिका कार्यालयाला भष्ट्राचाराचे ग्रहन*
एक वर्षापूर्वीच पालिकेचे मुख्याधिकारी कैलास झंवर यांना एका पालिकेच्या बांधकाम कंत्राटदाराकडुन लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्धा येथे अटक केली होती. त्याला अल्पकालावधी होत नाही तर आस्थापण विभागातील वरिष्ठ लिपिक प्रकाश चांदेकर यांला तक्रारारदार सफाई कर्मचाऱ्यांकडुन लाचेची सात हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना अटक केली.
या घटनेने सरकारी कार्यालय येथील कर्मचार्याना अतिरिक्त कमाईचे अड्डे बनल्याचे चित्र आहे या कर्मचाऱ्यांमुळे आज शासकीय कार्यालयातील कोणतेही काम लाच दिल्याशीवाय होतच नाही अशी परिस्थिती आहे. स्वतःच्या सहकारी कर्मचाऱ्यांकडुन सुध्दा लाच स्वीकारताना लाज कशी वाटत नाही हिच खरी शोकांतिका आहे