सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
साखरखेर्डा येथे एकाच रात्री पाच घरे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना 4 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली यामुळे शिक्षक कॉलनी व परिसरामध्ये खळबळ उडाली आहे !सिनखेडराजा तालुक्यातील शिक्षक कॉलनीत राहणारे संदीप मुंडकुळे दीपक भावसार वैभव खरात विनोद देशमुख व बागुलकर ।हे काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेऊन तीन डिसेंबरच्या रात्री पाच घरे फोडली या मध्ये दीपक भावसार यांच्या घरातील चार लाख रुपयांचे दागिने सव्वा लाख रोख तर ‘ श्री मुंडकूळे श्री खरात यांच्या घरातील किरकोळ दागिने घेऊन पोबारा केला ।ही घटना सकाळी उघडकीस आल्यामुळे दुय्यम ठाणेदार दिपक राणे प्रकाश मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले दरम्यान बुलढाणा येथून श्नान पथकास पाचारण केल्यानंतर श्वानाने आरोपीचा माग घेतला असता शेंदुर्जन – साखरखेडा रोडपर्यंत चोरटे गेल्याचे दिसून आले ।एकाच रात्री तब्बल पाच घरे फोडल्यामुळे साखरखेर्डा गावासह आसपासच्या खेडेगावांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना जेरबंद करू असे दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी सांगितले आहे यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली ।याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होत असल्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलीस पुढे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे !