सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
येथे नाफेड तुर खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते १ फेब्रुवारी रोजी करण्यात आला . मोहाडी येथील शेतकरी श्रीधर काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने तुर , हरबरा , मका या भरड धान्याची खरेदी करुन शेतकऱ्यांना भाव दिला . महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन असो , की नाफेडची खरेदी असो , खरेदीदारांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांना मालाचे चुकारे व्यवस्थीत देणे महत्वाचे आहे . मागील काळात तालुका खरेदी-विक्री संघाने तुर खरेदी केली होती. आजही काही शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाले नाही . या गैरकारभारामुळे शेतकरीच नागावल्या गेला . तो प्रकार होवू नये यासाठी सोन पाऊल अॅग्रो कंपणीने नाफेड मार्फत भरड धान्य खरेदी करतांना विश्वास संपादन केला आहे . चुकारे व्यवस्थीत दीले आहेत . त्यामुळे आज तुर खरेदीचा शुभारंभ करण्यासाठी आलो . येथेही काही गैर प्रकार झाले तर माफी नाही . असे उद्गारही त्यांनी साखरखेर्डा येथील तुर खरेदीचा शुभारंभ करतांना काढले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव हे होते . तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख ,सय्यद रफिक ‘दाऊद सेट कुरेशी ‘ पंचायत समितीचे माजी सभापती राजू ठोके , नाथाभाऊ दराडे , बाळासाहेब बेंदाडे , कांता पाटील वायाळ , मोहाडीचे सरपंच अशोक रिंढे , भानुदास लव्हाळे , श्रीधर काळे सुधीर बेंदाडे , पिंपळगाव सोनारा सरपंच तोताराम ठोसरे , रामदाससींग राजपूत यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन डी एन पंचाळ यांनी केले.