सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
ग्राम पंचायत निवडणूक निकाल लागल्यानंतर १८ ला रात्री दोन गटात हाणामारी झाली असता एक गंभीर जखमी झाला आहे .
त्याला तातडीने चिखली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . दोन्ही गटातील परस्पर विरोधी तंक्रारीवरून पोलीसांनी गुंन्हा दाखल केला आहे .
साखरखेर्डा येथील शे . रशिद शेख निसार यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार दिली की , शे तौफिक शेख गुलशेर यासह आठ व्यक्तींनी घरात घुसून लाठ्या काठ्यांनी शे रशिद यास आणि पत्नी , बहीन यांना मारहाण केली .
या हाणामारीत शेख रशिद हा गंभीर जखमी झाला . त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पोलीसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले .
परंतू मार जबर असल्याने डॉक्टरांनी तातडीने चिखली येथे हलविण्याचा सल्ला दिला .
काल १९ ला चिखली येथे जाऊन पोलीसांनी जबाब नोंदवला असता घरात घुसून मारहाण केली. आणि घरातील सामानाची नासधूस करुन कपाटातील ३५ हजार रुपये चोरुन नेल्याची माहिती शे . रशिद यांनी पोलीसांना दिली .
ही बातमी पण पहा आवर्जून
https://www.suryamarathinews.com/post/8143
त्याच्या जबाबावरुन पोलीसांनी आठ व्यक्ती विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत .
तर विरुध्द गटातील रिझवानाबी या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीसांनी शेख रशिद सह सात ते आठ व्यक्तींविरोधात विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत .
पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक दीपक राणे करीत आहेत .