सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढत असताना ‘आरोग्य कर्मचारी ,सफाई कामगार व पोलीस कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या काळजी साठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत,याचाच परिपाक म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन ते पूर्णपणे बरे झाल्याचे आपण बघितले आहेत,व परत ते जनतेच्या सेवेसाठी कर्तव्यावर हजर झालेले आहेत,तालुक्यातील सर्वात मोठे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार श्री दीपक राणे यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यामुळे श्री राणे यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी असे आव्हान केले आहे,साखरखेडा पोलीस स्टेशन मध्ये काही पोलिस कर्मचाऱ्याच्या कोरोना टेस्ट केली असता त्यामध्ये दुय्यम ठाणेदार श्री दीपक राणे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे ‘तर साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे ‘गेल्या चार वर्षापासून दुय्यम ठाणेदार श्री दिपक राणे हे आपले कर्तव्य चोखपणे साखरखेर्डा येथे बजावत आहे .ठाणेदार यांच्या खांद्याला खांदा लावून अविरतपणे ते आपली सेवा बजावत आहे .तरी जनतेने काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान यावेळी ठाणेदार श्री आडोळे यांनी केली आहे ‘