साकळी मनवेल थोरगव्हाण रस्ता काटेरी झुडप्यांच्या विळख्यात लोकप्रतिनीधीचे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे

 

यावल  तालुक्यातील साकळी मनवेल थोरगव्हाण रस्त्यावर काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असुन वाहनधारकांना याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे .या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनीधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी परिसरातील वाहनचालक व ग्रामस्थ करीत आहे.
काही दिवसापुर्वी थोरगव्हाण गावापासुन काटेरी झुडपे काढण्यासाठी कामासाठी जे.सी.बी आणले होते मात्र या जेसीबीने अपुर्ण काटेरी झुडपे काढण्यात आले असल्यामुळे पुनश्च वाहनधारकांना या अत्यंत धोकादायक अशा काटेरी झुडप्यांचा त्रस्त सुरू झाले आहे.या संदर्भात अधिक माहीती घेतली असता शासनाच्या वतीने या रस्त्याच्या काटेरी झुडपे काढण्यासाठी प्राप्त झालेल्या संपुर्ण नीधि सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन काढण्यात आला असल्याची आतील माहीती एका जबाबदार लोकप्रतिनीधीनी सांगीतली असुन, या गोंधळलेल्या माहीती मुळे त्या झुडपे काढण्याच्या पैशांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे .
साकळी मनवेल थोरगव्हाण ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजुने काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे कीरकोळ अपघातचे प्रमाण सातत्याने वाढले आहे.
थोरगव्हाण ग्रामपंचायत मार्फत यावल सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या पंधरा दिवसापासुन काटेरी झुडपे तोडण्यात यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले असुन ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन या वाहनधारकांच्या गंभीर अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे.
साकळी मनवेल थोरगव्हाण या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असुन लोकप्रतिनीधीचे दररोज ये जा सुरुच असते मात्र काटेरी झुडपे काढण्याचा समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहनचालक व सर्व सामान्य नागरीकां कडुन दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कारभारा बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आहे.

Leave a Comment