यावल Yaval ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की , जयश्री गोकुळ अडकमोल वय २८ वर्ष राहणार साकळी तालुका यावल हे आपल्या घरात करीत असतांना त्यांना मोबाइल क्रमांक७८८७५८५६८या मोबाइलवरून एका अज्ञात व्या वक्तीने कॉल केला ,दरम्यान जयश्री अडकमोल यांनी संबधीत फोन करणाऱ्यास आपण कोण बोलत आहे असे विचारले असता , फोन करणाऱ्या त्या व्याक्तिने नांव न सांगितल्याने महीलेने त्यास पुन्हा आपण कोण असे त्या व्यक्तीस विचारणा केल्यावर त्या व्याक्तीने कुठलेही कारण नसतांना फोन स्विकारणाऱ्या महिलेस शिवीगाळ केली म्हणुन , जयश्री अडकमोल यांनी यावल पोलीस ठाण्यात त्या मोबाईलवरून शिविगाळ करणाऱ्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन .
पुढील तपास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिकंदर तडवी करीत असुन , दरम्यान पोलिसांनी या संदर्भात सदरच्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता हा क्रमांक दुर्ग मध्य प्रदेशातील व्याक्तीचा असल्याचे लोकेशन दिसुन येत असल्याचे पोतीसांनी सांगीतले .