विठ्ठल अवताडे शेगाव
बुलढाणा नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे फार नुकसान झाले आहे सोबतच ग्रामीण भागातील बऱ्याच गावामध्ये नदी नाल्याच्या पुरामुळे गाव खेड्यातील लोकांचे प्रचंड नुकसान झाले आणि संपूर्ण शेती ही पाण्याखाली गेली.
असून ज्या शेतीवर शेतकऱ्याचा आणि मजुरांचा उदरनिर्वाह असतो त्यांची अवस्था दैनिय झाली आहे संदर्भात सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी दौरा करून पाहणी केली. तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि पाहणी केली.
शेगाव तालुक्यातील मनसगाव मंडळामध्ये प्रचंड नुकसान असल्यामुळे शासनाने नुकसान ग्रस्थ नागरिकांना मदत द्यावी आणि शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी आज नंदाताई पाऊलझगडे यांनी आज तहसीलदार साहेब यांच्या मार्फत जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आज निवेदन देवून मागणी करण्यात आली , यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी आणि नागरिकांची उपस्थिती होती