इस्माईल शेख शेगाव
शेगाव -गेल्या पंधरा वर्षा ंपासून अधिक वर्षा पासून रेणुका नगर येथे लोक वास्तव्यात आहे.शंभर टक्के अनुसूचित जाती जमाती चे लोक येथे राहत असून रेणुका नगर येथे ओपन पेस जागा असून स्थित असलेल्या सम्राट अशोक वाटिका येथे तथागत भगवान बुद्धाची मूर्ती सुध्दा स्थापित केलेली आहे .
याच ठिकाणी सम्राट अशोका बहुउद्देशीय संस्थेमार्फत अनेक सामाजिक,सांस्कृतिक, तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. शेगाव शहरामधे अशाच ओपन पेस जागेचा विकास होऊन त्यांचे सुशोभिकरण होऊन त्यांना नगरपरिषद मधून विकास निधी मिळून त्या ठिकाणांचा विकास करण्यात आलेला आहे.असे आमच्या लक्षात येऊन आम्हीही विनंती अर्ज तसेच निवेदनाद्रारे ही बाब लक्षात आणून देण्याचा प्रयत्न देखील केला.परंतु अध्याप त्याचा काहीही फायदा झालेला नाही.
ही गांभीरयाची बाब संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात घेता आम्हालाही नगरपरिषद मधून सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्या ओपन पेस जागेचे शिसोभिकरण करण्या करिता विकास निधी मंजूर करून आम्हाला धार्मिक सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी न्याय देण्याचे करावे.
तसेच त्याला संरक्षण भिंत मनून (वॉल कंपाऊंड) बांधून देण्यात यावे असे निवेदन शेगाव येथील रेणुका नगर येथील नागरिकांनी नगरपरिषद विकास अधिकारी यांना दिले.
सदर निवेदन आपल्या सहीनिशी देत असताना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे, शहराध्यक्ष प्रवीण बोदडे, विकी दाभाडे, प्रमिना बोदडे, जिजाबाई शेगोकार,रेखा रणीत, उषा भोजने,वीणा इंगळे, छाया वाघ,सुनीता वाघ, माया वाघ, सरला तायडे, सूनीला तायडे, आशा इंगळे सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था रेणुका नगर, बोधिसत्व महिला मंडळ, व्यंकटेश नगर, आम्रपाली नगर शेगाव. इत्यादी ठिकाणांचे समस्त शेगावकरी निवेदन देताना उपस्थित होते.