(प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना)
जालना परतिच्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.सोंगणीस आलेली खरीपाची पिके पाण्यात असल्याने शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान होत आहे.हातातोंडाशी आलेला घास पावसात खराब होत असल्याचे पाहतांना शेतकऱ्यांचा जिव मात्र कासविस होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले होते.परिसरातील सोयाबीन पिकाची सोंगणी-मळणी आदी कामे सुरू असतांना पाऊस पडत आहे.काही ठिकाणी सोंगणी करून शेतात सोयाबीनच्या पेंढ्याची पसर पडली आहे.तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन च्या गंज्जी घातले आहे.पावसामुळे सोयाबीन च्या पेंढ्याच्या खालच्या बाजूला शेंगाना कोंब फुटू लागली आहे.तसेच नुकसान होण्याची शेतकर्यांना चिंता लागत आहे.नेर परीसरात खरीपाची सोयाबीन,बाजरी,मका आदी पिके सोंगणीस आली आहेत.तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोगण्यांस सुरवातही केली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासुन परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे.त्यामुळे या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.बहुंताश पिंकामध्ये मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे.आधिच अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे.सोयाबिन पिकाची काढणी चालु आहे.मात्र पावसाने शेतकर्यांच्या कष्टाचे पाणीच-पाणी केले आहे.त्यामुळे काढणीस आलेले सोयाबिन पीक उद्वस्त झाले आहे.त्यामुळे नेर परिसरात मंगळवारी दुपारी तीन ते चार दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशीसह,सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले.बाधित पिकाचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे.अशी मागणी शाम राठोड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद जालना यांनी प्रशासनाकडे केली आहे.