जिजाऊची लेक मनिषाने केले रक्तदान
नांदुरा(प्रफुल्ल बिचारे):-
संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले असून या रक्तदान शिबिरात तब्बल ५३ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता कु.मनीषा रमेश पाटील या जिजाऊच्या लेकीन रक्तदान केले. तसेच भाजपा शहर उपाध्यक्ष प्रमोद हिवाळे यांनी या शिबिरात रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. या शिबिरात बऱ्याच समाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घानोकर यांनी ५०० रुपयांची मदत केली.
सदर रक्तदानासाठी खामगाव येथील शासकीय रक्तपेढीची चमू उपस्थित होती. तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री योगेश पाटील,जिल्हा सचिव डॉ.शरद पाटील,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,पुंडलिक काळे, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घानोकार,राष्ट्रीय विष्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,पत्रकार संतोष तायडे, प्रफुल्ल बिचारे, पुरुषोत्तम भातुरकर, उपस्थित होते. या शिबिराला नांदुरा नगरीचे नगराध्यक्षपती श्री अनीलभाई जवरे यांनी भेट दिली.