इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संत गाडगेबाबा चौकामध्ये03/07/2023 रोजी कर्तव्यदक्ष डी वाय एस पी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दबंग ठाणेदार पो. नि. विलास पाटील: स. फो. गजानन गावंडे बनं 669 पो को विकास जाधव ब.नं.2397 पो का गजानन डाबेराव पं.नं. 2627 शांताराम पुये .ब नं. 2336 असे शेगाव टावून मध्ये शहरात पेट्रोलींग
करीत असतांना गोपनिय बातमी दाराकडुन माहीती मिळाली
की, एक इसम हा गाडगे बाबा चौकाकडे शेगाव जवळ अवैधरीत्या देशी दारू शिश्या जवळ बाळगून विक्री करीत आहे या माहितीवरून आम्ही संत गाडगेबाबा चौकामध्ये पाहणी केली असता
एक इसम हातात वायरची थैली घेवून लोकाना थैली मधुन देशी दारू देवून त्यांचे कडून पैसे घेतांना दिसला वरुन आमची व पंचाची खात्री झाल्याने आम्ही त्याचेवर एकदम जावुन रेड करून त्यास जागीच पकडले पकडलेल्या इसमास आम्ही त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल विजय तुम्मे वय 32 वर्षे ह.मु.रा. आंबेडकर चौक शेगाव ता. शेगाव असे सांगितले
त्याच्या हातातील वायरच्या थैलीची पंचासमक्ष पाहणी केली असता थैलीमध्ये आम्हाला 90 एम एल मापाच्या देशी दारु टंगो पंच कंपनीच्या कंपनी सिलबंद 34 नग शिश्या प्रत्येकी कि 35/- रु प्रमाणे 1190/- रु. व एक वायरची थैली कि. 10/- रुपये, असा एकूण 1200/- रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष मिळून आला. सदर देशी दारू माल जवळ बाळगणे बाबत आम्ही त्याला परवाना विचारला असता
कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले वरून सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला. याबाबत शहर पोलीस स्टेशनचे नायक पोलीस कॉन्स्टेबल गजानन बाबाराव गीते बक्कल नंबर 653 यांच्या फिर्यादीवरूनआरोपी सुनिल विजय तुम्मे वय 32 वर्ष हम. रा. आंबेडकर चौक शेगांव ता. शेगाव कलम 65 (ई) प्रोव्ही कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Shegaon police