संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात नैसर्गिक आपत्तीत जीव गमावलेल्या पाच जणांच्या वारसांना राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप-क्रेडिट सोसायटीच्यावतीने आर्थिक साहाय्य देण्यात आले

 

. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील शहीद जवान राहुल श्यामराव मुळे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली. संस्थेचे कार्यकारी संचालक संदीपदादा शेळके यांनी मृताच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन मदत सुपूर्द केली. जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ येथील पंजाबराव उत्तमराव उगले व निंभोरा येथील सागर नामदेव दिगडे यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील संजय उत्तमराव मारोडे, रवी संजय भाळतडक यांनाही वीज पडल्यामुळे जीव गमवावा लागला. चौघेही व्यक्ती घरातील कमावते होते. त्यांच्यावर कुटुंबाचा प्रपंच चालायचा. काळाने त्यांनाच हिरावल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजर्षी शाहू परिवार अशा परिस्थितीत नेहमीच नागरिकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. मदतीचा हात पुढे करीत आपले सामाजिक दायित्व निभावले आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना करीत मृतांच्या वारसांना रोख मदत देण्यात आली. यावेळी मनोज वाघ, यश इधोकार, डॉ. सहदेवराव गोतमारे, कैलास मारोडे यांच्यासह ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment