अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
मोताळा:-स्थानिक श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा येथे अर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाली म्हणून अमृतमहोत्सव साजरा करण्याचे आव्हान भारताचे पंतप्रधान यांनी केले.त्या अनुषंगाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक महाविद्यालयास विविध कार्यक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या करता श्री शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले. ही निबंध स्पर्धा प्राचार्य डॉ.सुनिल मामलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे संयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम चाटे होते.तर या स्पर्धेचे समन्वयक रसायनशास्त्र विभागातील प्रा.नागेश गट्टूवार व सहसमन्वयक म्हणून रसायनशास्त्र विभागातील प्रा.निलेश राहाटे व प्राणिशास्त्र विभागातील डॉ.अरुण गवारे यांनी जबाबदारी पार पाडली. कोविड -१९ च्या प्रादुर्भावाचा विचार करून राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील एकूण १५० विद्यार्थी मित्रांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या घरून स्व:हस्तलिखित निबंध तयार करून ऑनलाईन पाठविले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक एस.एन.मोर महाविद्यालय भंडारा येथील कु.स्नेहा चंदनलाल चौधरी हिने प्राप्त केला.दुसरा क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय चिखली येथील कु.साक्षी सुनिल चव्हाण हीने प्राप्त केला.तिसरा क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील कु. गायत्री विठ्ठलराव देशमुख हिने प्राप्त केला. या सर्व विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस ऑनलाईन स्वरूपात देण्यात आले.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण आभासी पद्धतीने करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव भारतभर साजरा होत असताना श्री शिवाजी महाविद्यालयाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करून तरुणांना भारताच्या इतिहास,वर्तमान व भविष्य या बद्दल व्यक्त होण्यास संधी उपलब्ध करून दिली.सहभागी स्पर्धकानी अंतर्मुख करणारे विचार आपल्या लिखाणातून मांडले.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रत्येक घटकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभले.