श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची नवरात्री निमित्य दुर्गामाता दौड चे आयोजन

 

हिंगणघाट: दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा नवरात्री मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंगणघाट विभागाची दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून घटस्थापनेच्या दिवशी पासून निघणार आहे. घटस्थापना ते दसरा पर्यंत या दौड चे आयोजन शिवप्रतिष्ठान चे धारकरी करतात.

श्री राजमाता जिजाऊंनी शिवप्रभु पोटात असताना नवरात्रात अखंड नऊ दिवस आई तुळजाभवानी चा जागर करून जगदंबेच्या चरणी देशा, देवा, धर्मासाठी मागितलेले वरदान व आशीर्वाद तेच पुनरुपी मागण्याची प्रथा उपक्रम म्हणजे दुर्गामाता दौड.

या दौड मध्ये धारकरी व पुरुष, महिला, तरुण युवक, युवती व लहान मुले, मुली नवरात्रीत दरदिवशी पहाटे देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती पर गीते व श्लोक म्हणीत. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची, कार्यकर्तृत्वाची, ध्येयधोरणाची, आकांक्षा बनवण्यासाठी व असंख्य राष्ट्रपुरुष, देशभक्त, धर्मभक्त, नरवीर मावळे या सर्वांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी नवरात्रीत दरदिवशी पहाटे दौड शहरातील देवीच्या एका मंदिरात जातात. या दुर्गामाता दौड मध्ये भगवा ध्वज, शस्त्र पथक असतात. तसेच या दौड मध्ये, शहरातील व ग्रामीण भागातील, तरुण, तरुणी, महिला, पुरुष व समस्त धारकरी उपस्थित असतात.

या स्फूर्ती प्रेरणादायक, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती बिंबवणाऱ्या कार्यात शहरातील व ग्रामीण भागातील सहकुटुंब आप्तजन यांनी हिंगणघाट मध्ये होणाऱ्या दुर्गामाता दौड मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी आग्रहाची व कळकळीची विनंती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंगणघाट चे समस्त धारकरी यांनी केली आहे

Leave a Comment