शैक्षणिक कामाकारीता आवश्यक असलेल्या शालेय कागदपत्रे देण्यास पैशाची मागणी करीत कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

 

करणाऱ्या इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलडाणा द्वारा संचालित कृषी तंत्र निकेतन विद्यालय मलकापूर या संस्थेविरूध्द कारवाई करून त्या विद्यार्थीनीस पुढील शिक्षणाकरीता आवश्यक असलेली कागदपत्रे तात्काळ देण्यास विद्यालयास निर्देश देण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज ९ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी बुलडाणा यांच्याकडे तहसीलदार मलकापूर यांचे मार्पâत एका निवेदनाद्वारे केली आहे. शालेय कामाकरीता शालेय
निवेदनात नमूद आहे की, इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलडाणा द्वारा संचालित कृषी तंत्र निकेतन विद्यालय मलकापूर या संस्थेमध्ये कु.पल्लवी शिवसिंग हळदे रा.भालेगाव ही विद्यार्थीनी शिक्षण घेत होती. तिचा ३ वर्षाचा असलेला कोर्स पुर्ण झाला असून ती पास झाली आहे. त्यामुळे तिला पुढील शैक्षणिक कामाकारीता व पुढील शिक्षणाकरीता तिला शालेय कागदपत्रांची आवश्यकता आहे. मात्र विद्यालयातून तिला शालेय कागदपत्रे देण्यास शालेय फी ६५ हजार रूपयांची मागणी करण्यात येत असून जोपर्यंत पैसे भरत नाही, तोपर्यंत कागदपत्रे देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सदर विद्यार्थीनीने शैक्षणिक स्क्वॉलरशिप करीता अर्ज केला होता, मात्र तिला स्क्वॉलरशिप एकाही वर्षाची मिळाली नाही. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाकीची असून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मोलमजुरीवर चालतो. शिवूâन कुटुंबासाठी काहीतरी करण्याची इच्छा तिची असलीतरी विद्यालयाच्या अशा प्रकारे अडवणुकीमुळे तिच्यावर पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
तेव्हा तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा याकरीता तिला शालेय कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाNया शैक्षणिक संस्थे विरूध्द कडक कारवाई करण्यात येवून तिला तात्काळ कागदपत्रे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी केली आहे.
निवेदनावर अजय टप यांच्या सह संतोष जाधव, निलेश चोपडे, अमोल बावस्कार, अजित पुंâदे, शुभम घुले, महेश हळदे, शिवसिंग हळदे, शितल जांगडे, संजय इंगळे, बलराम बावस्कर, उमेश जाधव, शालीकराम पाटील आदींच्या स्वाक्षरीया आहेत.

Leave a Comment