वडनेर :- दि.27 मार्च
शेत खरेदी केलेल्या शेताचे वादातून मोठ्या लाडी- गोडीने शेतकऱ्याला गाडीवर बसवून शेतात नेऊन डोळ्यात तिखट घालून दगडाने ठेचून जिवानिशी ठार केले. हि घटना दुपारी १ वा.चे सुमारास घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून आरोपीस वडनेर पोलिसांनी अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, वडनेर येथील रहिवासी दिनेश मारोती महाजन, वय ४० याने गावातील प्रमोद दादाजी भाके, वय ६० याचे पाच एकर शेत विकत घेतले.मात्र, शेतातील धुऱ्यावरुन वाद अलीकडे उफाळून आला. आरोपी प्रमोद भाके याने दिनेशला आज सकाळी मोठ्या लाडीगोडीने गाडीवर बसवून शेतात नेले आणि त्याचा काटा काढला.शेतशिवारात असलेल्या बंधाऱ्याच्या बाजूला प्रमोदने दिनेशच्या डोळ्यात तिखट फेकून दगडाने घाव घातला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर अक्षरशा दगडाने डोक्यावर ठेचून त्याला जिवानिशी ठार केले.
याप्रकरणी वडनेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद.
सचिन वाघे वर्धा