सिंदखेडराजा (सचिन खंडारे )
सिंदखेड राजा तालुक्यातील पांग्री काटे या गावांमध्ये दोन बैला चोरीला गेल्याची घटना दिनांक 31 जानेवारीच्या मध्यरात्री घडली .
त्यामुळे पशु मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ‘अगोदरच शेतकरी अतिवृष्टीमुळे तसेच नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे बळीराजा शेतीची मशागत करण्याकरता गाय ‘बैलांचे संगोपन करतो ‘ काळजी घेतो ‘परंतु याकडे सुद्धा चोरट्यांची लक्ष आहे ‘ जनावराची सुद्धा चोरी केले जातेही दुर्दैव आहे ‘पांग्री काटे येथील विश्वास तुळशीराम बोरे ‘यांचा गावाजवळच जनावराचा गोठा आहे तुळशीराम बोरे ‘ हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे गोठ्यामध्ये बांधले असतांना ’31 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे लाल रंग असलेले पंचेचाळीस हजार रुपयाचे दोन बैल ‘चोरून नेले सकाळी ‘नेहमीप्रमाणे चारा पाणी करण्यासाठी विश्वास तुळशीराम बोरे हे गोठ्यामध्ये गेली असताना त्यांना बैल आढळून आले नाही .त्यांनी चोहीकडे शोधाशोध केली असताना कुठेही बैलाचा थांगपत्ता लागला नाही ‘