इस्माईल शेख शेगावप्रतीनिधी
अकोला- पुर्व विदर्भा प्रमाणे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना दिवसा 12 तास विज पुरवठा द्या दिंनाक 16 जानेवारी रोजी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने विद्युत भवन येथे रुमणे आंदोलन आयोजित करण्यात आले.
विदर्भा प्रमाणेच पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना 12 तास विज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शिवसनेचे खासदार मा. श्री अरविंदजी सावंत यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्च्यात हजारोच्या संख्येने शिवसैनिक,महीला शिवसैनिक, तथा शेतकरी आपली उपस्थिती दर्शवली या मोर्च्यात आमदार मा. नितीन देशमुख सह संपर्क प्रमुख सेवक राम ताथोड, जिल्हा प्रमुख मा. गोपाल भाऊ दातकर यांच्या वतीने महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.
रात्रीला विज पुरवठा होत नसल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना साप, विंचू, जंगली जनावरे डुकरे तडस इत्यादीच्या हल्याची जोखीम स्वीकारुन आपला जिव धोक्यात ठेवुन पिकांना पाणी द्यावे लागते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू पण झाल आहे.
एकाच राज्यात एकाच विदर्भा भागातील शासन भेदभाव करीत आहे पुर्व विदर्भातील शेतकऱ्यांना 2 जुन 2022 रोजी आदेश काढुन दिवसा 12 तास विज पुरवठा करण्याचे आदेशित केले इकडे मात्र रात्रीला विज पुरवठा तोही पुरेसा होत नाही कधी चार तास दिल्या जातो तर कधी रात्रभर बंद ठेवल्या जातेे पश्चिम विदर्भा तील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे.
हा अन्याय तातडीने थांबवावा अकोला जिल्हा शिवसनेने शेतकऱ्यांच्या सामने मोर्चाचे आयोजन केले या मोर्च्यात अजय दादा खुमकर युवा सेना जिल्हाप्रमुख, राहुल भाऊ कराळे उपजिल्हा प्रमुख युवा सेना ओम भाऊ साकरकार उपतालुका प्रमुख युवा सेना पंकज भाऊ काळणे, भास्कर अंभोरे प.स.सदस्य, गोपाल इंगळे, बंडू माळी, मनीष बुटे, दिलीप परनाटे, निवृत्ती फुकट चेतन गोरले संतोष मोडक, आनंद अढाउ,नितीन ताथोड, छोटु हलवने,एकनाथ दांदळे,प्रविण फुकट,भिकाजी पांतोड, बंडू वाघमारे, व सर्व अकोला जिल्ह्यातील शिवसैनिक, शिवसैनिक, शेतकरी पदाधिकारी, यानी उपस्थिती दर्शवली