गजानन सोनटक्के जळगाव जा
सोयाबीन ,मका ,कपाशी इत्यादी पिकाचा नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे बाबत तसेच पिक विमा मिळणेबाबत खेर्डा येथील शेतकऱ्यांनी दिले तहसिलदारामार्फत पालकमंत्र्यांना निवेदन यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन ,मका ,कपाशी या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे ,ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सोयाबीन भरण्याच्या काळ असताना पावसाच्या सतत येण्यामुळे सोयाबीन झाडाची फूलगळ होऊन सोयाबीन झाडाला शेंगा एकदम कमी किंवा लागल्यास नाही व त्या भरल्या सुद्धा नाही सोयाबीन पिकाचे दाने ज्वारी पिकाच्या जाण्या एवढे बारीक आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा निघेनास झाला आहे तसेच या वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी सुद्धा करावी लागलेली आहे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात रोटावेटर सुद्धा केलेले आहे तसेच कापसाची बोंडे काळे पडलेले आहेत त्यामुळे कपाशीचा भाव पंचवीसशे ते तीन हजार इतकाच शेतकऱ्यांना मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे ,मका पीक पावसामुळे जमीनदोस्त झालेले आहे मक्याचा काढणी खर्च दुप्पट झाला असून उत्पादन निम्म्यावर आले आहे तरी आपण याची गंभीर दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावा ही विनंती या निवेदनावर प्रवीण भोपळे ,राजेंद्र उमाळे, वासुदेव राजनकर ,जय प्रकाश तायडे ,एम आर वानखडे, योगेश म्हसाळ, पुर्णाजी वानखडे, सतीश देशमुख, गोपाल उमरकर, समाधान खिरोडकार, भास्कर घोपे, रामदास नवथले ,जनार्दन कुटे,ज्ञानदेव राजनकार व इतर तीनशे शेतकऱ्यांच्या सह्या आहेत