सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी
सिल्लोड ( ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष च्या आदेशानुसार शेतकरी व कामगाराच्या विरोधात केंद्र भारतीय जनता पक्षाचे सरकार ने केलेल्या कायदा दुरूस्ती विधेयक च्या विरोधात
औरंगाबाद जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्ष तर्फे पूर्ण जिल्ह्यात दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त लाक्षणिक उपोषण व निदर्शने सिल्लोड व सोयगाव तालुक्या तील तहसील कार्यालयात समोर अयोजित करण्यात येणार असून त्याची पूर्व तयारी साठी काँग्रेस आय च्या प्रमुख पदाधिकाऱ्यां ची सिल्लोड येथे करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, केंद्र भाजपा सरकार ने शेतकऱ्यांवर व कामगारांवर अन्याय करण्याचे धोरण स्वीकारून शेतकऱ्यांवर व कामगार संबंधित कायदात दुरुस्ती करून त्यास लोकसभेत व राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यात आले त्यावरून केंद्र सरकार ने ते विधेयक रद्द करावे या मागणीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात लक्षणीय उपोषण व निदर्शने करण्याचा निर्णय घेऊन दो ऑक्टोबर रोजी सिल्लोड व सोयगाव तालुक्यात च्या तहसील कार्यालयात समोर लक्षणीय उपोषण व निदर्शने करण्यात येईल. यावेळेस जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर,प्रदेश सचिव रविंद्र काळे,सिल्लोड तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील, जिल्हा सरचिटणीस कैसर आझाद शेख , माजी सभापती विजय आबा दौड, यूवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मंगेश कळम, यूवक काँग्रेस शहराध्यक्ष शेख आवेस आझाद, शांतीलाल अग्रवाल, सोयगाव तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, उमेश सरोदे, अल्पसंख्याक विभाग चे अध्यक्ष बूर्हानखाॅ पठाण,साजेदखाॅ पठाण, शेख रऊफ ,कृष्णा जाधव, महीला मागासवर्गीय अध्यक्ष यशोदा बाई साबळे, शेख मोईन, मूबीनखाॅ पठाण, रामेश्वर कळम, उस्माण पठाण, विश्वास नाईक,धनजय भास्कर, विजय राठोड, संजय शिंदे, सोमनाथ शेळके,आदी मोठ्या संख्येत कार्यकर्ते व पदाधिकाऱी उपस्थित होते.