शेगांव चे गजानन महाराज मंदिर आजपासून खुले, श्रीं च्या दर्शनासाठी शेगावात भक्तांची रांग,

 

आयुषी दुबे शेगाव

विदर्भाचे प्रती पंढरपूर म्हणून पाहल्या जाते श्रींच्या शेगावकडे ..

कालपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे… याच पार्श्वभूमीवर विदर्भाची पंढरी म्हणून मानल्या जाणारया शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर मात्र , आज पासून म्हणजेच एक दिवस उशिरा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे… मंदिरात भाविकांची एकाच जागी गर्दी होणार नाही, आणि शासनाने घालून दिलेल्या शिस्तीचे पालन व्हावे यासाठी मंदीर प्रशासनाने वेगवेळ्या उपाय योजना केल्या आहेत…

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने टोकाचे पाऊल उचलीत बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगावचे श्री संत गजानन महाराज संस्थानला पत्र पाठवून १७ मार्च पासून श्रींचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्याचे आदेश दिले होते. .. त्या आदेशाला आता ८ महिन्यांचा कालावधी उलटला असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवार पासून राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्याचे आदेश दिले होते, मात्र भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गजानन महाराज मंदिर हे एक दिवस उशीर म्हणजेच आज पहाटे 5 वाजे पासून श्रींचे मंदिरे भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे… यामुळे आज पहिल्याच दिवशी मंदिरात भक्तांची रांग लागलीय..

एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, मंदिर परिसरात तोंडावर मास्क असणे आवश्यक असून शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या आहेत. . त्यात दर्शसनासाठी ई पास लागणार असून सोबत आधार कार्ड ही लागणार आहेत.. आज सद्रहरण 10 हजार भाविक दर्शन घेतील.. त्यासाठी सोअशल दिस्तान्सिंग चे पालन करावे लागणार आहे..

 

Leave a Comment