प्रमोद जुमडे.हिंगणघाट/वर्धा
दिनांक १३ जुलै २०२३ ला कारंजा चौक येथे शिवसेना, महिला आघाडी, युवासेना हिंगणघाट च्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे तसेच नितेश राणे यांना जोडे मारून निषेध करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव साहेब यांनी नागपूर येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेतला. त्या मेळावा मध्ये कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी आताच्या सरकारमध्ये असलेले राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे शिंदे गट सरकार मधून बाहेर पडला असा आरोप केला होता.
आता हेच अजित पवार या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते की, राष्ट्रवादी सोबत सरकारमध्ये कधीही सोबत करणार नाही.
त्यांच्यासोबत युती होणे शक्य नाही. अशी ही ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप साहेबांनी या कार्यकर्ते मेळाव्यात ऐकवली . आणि विदर्भाला लागलेला कलंक या शब्दात देवेंद्र फडणवीस ची निंदा केली. याच भाजप ने काही दिवसांपूर्वी ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच लोकांना सरकार मध्ये सामील करून घेतले.
प्रदेश भाजप चे अध्यक्ष बावनकुळे यांनी महाराष्ट्रात आणि विदर्भात रस्त्यावर फिरू देणार नाही असे व्यक्तव्य केले होते. आणि उपमुख्यमंत्री आणी नितेश राणे यांनी अपशब्द वापरले म्हणून हिंगणघाट येथे त्यांचा निषेध करण्यात आला.
या निषेध कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, जिल्हा संघटक भारत चौधरी, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमने, उपतालुका प्रमुख प्रकाश अनासने, महिला जिल्हा संघटिका सौ.संगीता कडू, नगर सेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, मनोज वरघणे, तालुका संघटिका सौ.माधुरी खडसे, शहर संघटिका सौ. सिमा गलांडे, सौ. निता धोबे, भास्कर ठवरे, बंटी वाघमारे, युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर, शहर समन्वयक प्रकाश घोडे, शहर संघटक मनोज मिसाळ, गजानन काटवले, शंकर मोहमारे, उप शहर प्रमुख संजय पिंपळकर, लक्षमन बकाने, शंकर झाडे, आशिष जैस्वाल, दिनेश धोबे, अनंता गलांडे,
विभागीय प्रमुख मोहन तुमराम, रुपेश काटकर, अनिल लालटेनवार, नितीन वैध, पवन तिवारी, सचिन मुडे, हिरामण आवारी, प्रशांत आवारी, सुनील आष्टीकर, गोवर्धन शाहू, लक्ष्मीकांत भगत, कमलेश वजेकर, योगेश कामडी, अशोक तपासे, बलराज डेकाटे, गौरव गाडेकर, प्रकाश भुसारी, उमेश धोबे, अनिल कुंभारे, संजय भेदूरकर, राजू मंडलवार, विक्की देवगिरकर, आशिष भांडे, भोला ठाकूर, विजय कंगाले मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख, शुभम निमजे, पिंटू चव्हाण, भास्कर कोल्हे, विक्रम देवगिरकर, सौ. प्राची पाचखेडे, सौ. सारिका अनासाने, विनोद मोहळ, सौ. माधुरी खडसे, ज्योती पोहनकर, शंकर भोमले, भारत नागपुरे, रवी उईके, अनुराग काशीनिवास, गौरव गडेकर, योगेश कामडी, रंजीत रहाटे, भूषण सातघरे, मयूर ठाकरे, मोहन जाधव, रवी शेट्टी, संतोष चौधरी, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.