उषा पानसरे असदपूर
दिनाक 23 /फेब्रूवारी अमरावती
शिव जयंती उत्साहात साजरा अमरावती शिवगडावर उत्साहात पार पडला. याप्रसंगी `शिवसृष्टी’ निर्माण कार्यात योगदान देणाऱ्या `शिवगड संवर्धन समिती’च्या सर्व कर्मचाऱ्यांचा मराठा सेवा संघाने सन्मान केला.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सव शिवगडावर आयोजित करण्यात आला होता. शिवगडाच्या पायथ्याशी असलेल्या `खुले रंगमंच’ याठिकाणी सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला. २०१८ सालापासून `शिवसृष्टी’ निर्माण कार्यात योगदान देणाऱ्या सर्व सफाई कामगार, सुरक्षारक्षक, सुपरवायझर, मजूर यांचा मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमा, पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला. `शिवगड संवर्धन समिती’चे उपाध्यक्ष दिनेश बूब यांचाही शाल, जिजाऊ प्रतिमा, पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे वक्ते प्रा.निलेश सोनटक्के, यवतमाळ यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता. व्याख्यानाचा विषय होता `अष्टपैलू व्यक्तिमत्त्व छत्रपती शिवाजी महाराज’. छत्रपतींच्या इतिहासाची मुद्देसूद मांडणी निलेश सोनटक्के यांनी केली. कार्यक्रमाला शेकडो शिवभक्त, शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव तथा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे समन्वयक संजय ठाकरे व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या क्षिप्रा मानकर यांनी केले. प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे शहरअध्यक्ष इंजि.प्रदीप अंधारे, तर आभार सिंधू संशोधन संस्थेचे समन्वयक प्रा.डॉ.प्रफुल्ल गुडधे यांनी मानले. यावेळी प्रमुख पाहुण्या आमदार सुलभा खोडके, कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी, तर प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री डॉ.सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, स्विकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे, मनपाचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, `समता पर्व प्रतिष्ठान’चे सुधाकर तलवारे, मनपा आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष इंजि.अरविंद गावंडे, `जिजाऊ ब्रिगेड’च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक मयुराताई देशमुख, बंडू हिवसे, अर्जुन ठोसरे, सुप्रसिद्ध उद्योजक नितीन कदम, `जिजाऊ ब्रिगेड’च्या जिल्हाध्यक्षा मनाली तायडे, रामेश्वर अभ्यंकर यांची होती.
कार्यक्रमाला शेकडो शिवप्रेमीची उपस्थिती होती