तोडगा न निघाल्यास २१ जुलै ला होणार सिंदी (रेल्वे) नगर पालिकेवर जनतेचा जनआक्रोश मोर्चा…..अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा. काँ. पार्टी..
हिंगणघाट – हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी (रेल्वे) येथे घरघुती (कर)घरटॅक्स दरात ३५ ते ४० टक्के वाढ केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व संतप्त नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालीत वाढ केलेला घर टॅक्स तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली होती.
यावेळी अतुल वांदिले यांच्यासह शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित होते यादरम्यान सिंदी रेल्वे येथील संतप्त नागरिकांनी देखील नगरपालिका प्रशासनाच्या गोंधळ धोरणाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता.
सिंदी रेल्वे येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी महिन्यातील तीसही दिवस गैरहजर असतात, यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित राहत असल्याची ओरड सुरू होती.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सिंदी रेल्वे येथे जात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेत मुख्याधिकारी कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.
सिंदी रेल्वे येथे प्रत्येक नागरिकांचा घराचा टॅक्स 35% ते 40% टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे याबाबत अतुल वांदिले यांनी माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्याशी चर्चा केली असता विषयाची दखल घेत अनिलजी देशमुख यांनी वर्धा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा. जो काही सामान्य नागरिकांना भूदंड भरावा लागत आहे. तो कर सामान्य जनता 5 ते 10% टक्केच कर वाढ नागरिक भरू शकतात. त्यापेक्षा जास्त कर सामान्य जनता भरू शकत नाही. असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना स्पष्ट शब्दात सांगितले.
परंतु आताही जर कर (घरटॅक्स) कमी करण्यात नाही आला तर येत्या २१ तारखेला जनतेचा जनआक्रोष मोर्चा नगर पालिकेवर धडकणार यांचे जे काही पडसाद उमटणार त्याची सर्वश्री जवाबदारी शासन प्रशासनाची राहील अशी भूमिका अतुल वांदिले यांनी स्पष्ट केली.