सिंदखेड राजा (सचिन खंडारे)
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता शिंदी येथे दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत व साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने शिंदी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये कोरोना चाचणीचे आयोजन करण्यात आले होते,शिंदी चे ग्रामसेवक अर्जुन गवई व सरपंच विनोद खरात यांच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले होते ‘सकाळी नऊ वाजेपासून कोरोना चाचणीला सुरुवात करण्यात आली होती ‘यामध्ये सर्दी खोकला ताप असलेली व्यक्ती,दमा, बी पी, शुगर, असलेली व्यक्ती,तसेच करून पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात असलेली हाय रिक्स व्यक्ती, असलो स्लो रिक्स व्यक्तीचा यात समावेश होता . तरुण महिला वयोवृद्ध माणसांनी हिरहिरीने सहभाग नोंदवला .व कोरोना चाचणी करून घेतली ‘यामध्ये तब्बल १०९ जणांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली यानंतर हे स्वॉब तपासणीसाठी बुलढाणा येथे पाठवण्यात आले असून उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येणे बाकी आहे,येळी पत्रकार सचिन खंडारे सरपंच विनोद खरात प गजानन भांड ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश बंगाळे अरविंद खंडारे सुनिल ताडे आदींनी यावेळी आपली कोरोना टेस्ट करून घेतली,यावेळी ग्रामसचिव अर्जुन गवई, सरपंच विनोद खरात,समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वायाळ ‘आरोग्य सहायक श्री बी ए भोंडे,आरोग्य सेविका जे .एस . चांगाडे,आरोग्य सेविका डी ए पिठलोड,पी टी एल ए , श्रीमती गीता नरवाडे,आशा सेविका सौ लता बंगाळे, आशा सेविका उर्मिला बुरकुल,आदींनी यावेळी उपस्थित राहून सहकार्य केले,