सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
गेल्या अनेक वर्षापासून शिंदे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत रिक्त असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारीपदी अखेर प्रशांत वायाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला !
यावेळी नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी ‘प्रशांत वायाळ यांचे शिंदी गावचे सरपंच विनोद खरात यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले ‘यावेळी आरोग्य सेविका स्वाती डोंगरदिवे ‘ आरोग्य सेविका ज्योती चांगडे ‘मदतनीस गीता बुरकुल ‘आशा स्वयंसेविका उर्मिला बुरकुल व लता बंगाळे ‘यांच्या शिवाय .सचिन खंडारे कडुबा खंडारे अजय खंडागळे आदी उपस्थित होते .आपण आपल्या आरोग्य विभागा अंतर्गत निष्ठेने आणि काळजीपूर्वक काम करू तसेच आरोग्य जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करू लोकांची सेवा करू असे प्रतिपादन यावेळी नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी वायाळ यांनी व्यक्त केले ।