शिंदी येथे अंदाजे 340 कोटीची विविध विकास कामे सुरू ‘ तर काही कामाचे भूमिपूजन !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे दिनांक ६मार्च रोजी शासनाच्या अटी व नियमाच्या अधीन राहून विविध विकास कामाचे भूमिपूजन व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे ‘यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय रामभाऊ जी जाधवव माझी कृषी सभापती तथा विद्यमान जि प सदस्य दिनकर बापू देशमुख .साखरखेडा चे माजी सरपंच कमळाकर गवई यांच्या हस्ते टिकास मारून व नारळ फोडून विविध विकास कामे सुरू करण्यात आली ‘या कामांमध्ये,स्मशानभूमी वॉल कंपाऊंड ‘दलित वस्ती मधील सिमेंट रस्ते,शाळा दुरुस्तीचे काम,पालकमंत्री पांदन रस्ते,भोगावती नदीवरील सिमेंट बंधारे,पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पेयजल योजना,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती व सुशोभीकरण,,एकूण अंदाजे रक्कम 3 कोटी 40 लाख रुपयांचे विविध कामे प्रत्यक्षपणे सुरुवात करण्यात आली,यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ,माजी कृषी सभापती दिनकर बापू देशमुख, साखरखेडा चे माजी सरपंच कमळाकर गवई,ग्राम सचिव अर्जुन गवई,सरपंच विनोद खरात,पत्रकार सचिन खंडारे,पोलीस पाटील मदन हाडे,रमेश पागोरे केशव बंगाळे,भगवान बंगाळे पाटील,बद्री वायाळ, गजानन खरात ग्रा. प . सदस्य,प्रल्हाद मोरे,सखाराम खरात, अशोक खंडागळे, पंढरी आटोळे,मधुकर गावडे, खरात,सोपान खरात, पंजाबराव हाडे,शिवदास खरात,यशवंतराव खंडारे ‘ भगवान गवई,अच्यूतराव खरात मास्तर हे मान्यवर यावेळी सुरक्षित अंतरावर उभे होते ‘विविध कामे सुरू असल्यामुळे शिंदी गावाची वाटचाल एका आदर्श गावाकडे सुरू झाली आहे ।

Leave a Comment