शाळा द्या। नाहीतर दाखले द्या।गोळेगाव बुद्रुक येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शेगाव पंचायत समितीवर एल्गार ।

 

शेगांव-अर्जुन कराळे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कलम २१ अ नुसार शिक्षणाचा हक्क दिला त्यामुळे सर्वत्र सर्व शिक्षा अभियान राबविण्यात आले त्या अभियाना अंतर्गत शाळांना अनुदान देत इमारती वर्गखोल्या शैक्षणिक साहित्य सर्व भौतिक सुविधा दिल्या गेल्या हेतू एकच होता की कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे परंतु येथील स्थानिक प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत याच कारणामुळे येथील जिल्हा परिषद शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत, शिक्षण वाचवा देश वाचवा या उद्देशाने आज
देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांचा आज शाळा खोली अभावी शेगाव येथे शिवाजी चौकातून पंचायत समिती कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शाळा द्या नाहीतर दाखले द्या, पंचायत समिती प्रशासन मुर्दाबाद, जिल्हा प्रशासन मुर्दाबाद, शिक्षण वाचवा देश वाचवा, अशा आक्रोशात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी शासनाप्रती रोष व्यक्त करीत हा मोर्चा काढून पंचायत समिती कार्यालयावर बीडिओच्या केबिन समोर ठिय्या आंदोलन केले।
सविस्तर वृत्त असे आहे की शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोळेगाव बुद्रुक येथील जि, प ,शाळा वर्ग खोली आणि अंगणवाडी ही गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिशय शिकस्त झालेली आहे मुख्याध्यापक एस एस पीलात्रे आणि अंगणवाडी सेविका माया गव्हाळे यांनी तीन-चार वर्षांपासून खोली शिकस्त असून नवीन खोली मिळणे करिता कागदोपत्री पाठपुरवठा केलेला आहे परंतु अद्यापही खोली मंजूर झाली नाही सदर शाळा खोली संदर्भात वेळोवेळी दैनिक सकाळमध्ये वृत्त प्रकाशित झालेले आहे परंतु झोपेचे सोंग घेत असलेले कर्मचारी अधिकारी यांच्या वेळ काढून धोरणामुळे आज रोजी गोळेगाव बुद्रुक येथील शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत गोळेगाव बुद्रुक येथील जि प शाळा वर्ग खोली मंजुरात झाली होती १0 ऑक्टोंबर २०२१ रोजी जि प सदस्य राजाभाऊ भोजने यांनी सदर कामाचे भूमिपूजन सुद्धा केले होते परंतु ही वर्गखोली गोळेगाव बुद्रुक ऐवजी येथील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे गोळेगाव खुर्द झाल्याने ती मंजुरात रद्द झाली आहे शाळा बांधकाम मिळण्यासाठी पालकांनी १२मार्च २०२२ रोजी शाळेला दहा दिवस कुलूप ठोकले होते परंतु गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शाळापूर्वरत चालू करण्यात आली परंतु आज रोजी पालकांनी प,स,शेगाव येथे संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता फाईल सिओच्या टेबलवर असल्याचे गेल्या पंधरा दिवसापासून सांगत आहेत त्यामुळे या बांधकाम मंजुरातीचे गोड बंगाल कुठे दडलेले आहे याचा प्रश्न निर्माण झालेला आहे गोळेगाव बुद्रुक येथे आज रोजी चार वर्ग आणि एकाच खोलीत भरत आहेत तसेच अंगणवाडी ही गेल्या दोन वर्षापासून भाड्याच्या दहा बाय दहा रूम मध्ये २२ विद्यार्थ्यांसह भरत आहे शाळेला वॉल कंपाऊंड नाही शाळेच्या अवतीभवती जनावरांचे वास्तव्य घाण, कचरा आहे शाळेला मुताऱ्या नाहीत संडास नाहीत अशी दयनीय अवस्था शाळेची झालेली आहे।
विद्यार्थी देशाचे भवितव्य आहेत आणि त्यांचीच अशी दयनीय अवस्था काय असेल उद्याचे देशाचे भवितव्य असा प्रश्न आता ग्रामस्थ करीत आहेत।

आज दिनांक एक १ ऑगस्ट २०२२ च्या या आंदोलनात गोळेगाव बुद्रुक येथील जि प शाळेच्या वर्ग खोलीची मंजुरात १५ ऑगस्ट पर्यन्त न झाल्यास विद्यार्थ्यासह आम्ही सर्व पालक जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषण करणार।

*धम्मपाल समदूर*
अध्यक्ष शाळा समिती जि प शाळा गोळेगाव

Leave a Comment