प्रतिनिधी l विकी वानखेडे
शालेय जिवणातच मुला-मुलींनी विविध कौशल्य आत्मसात करुन विकास साधला पाहीजे.शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यवसायमुल्य शिकुन भविष्यात त्याचा वापर आपण केला पाहीजे.कोणते शिक्षण,व्यवसाय ठराविक मर्यादित न ठेवता आपल्यास जे जमेल त्यात आपण आपण भविष्य उज्वल करता आले पाहीजे असे मार्गदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी कार्यक्रमात केले.
तालुक्यातील किन्ही येथिल सर्वोदय हायस्कुल मध्ये समता फाउंडेशन व हायस्कुल यांच्या संयुक्तपणे मुलींना सायकल वाटप करण्यात आले.यावेळी जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक डी पी साळुंके यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
समता फाउंडेशन व सर्वोदय हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक आणि शिवणकाम हे कोर्स विद्द्यार्थ्यार्थांसाठी शाळेत शिकविले जातात.
शाळेतील मुले व मुली आनंदाने एक प्रकारचे जीवनावश्यक व्यावसायिक शिक्षण घेत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर समता फाउंडेशन चे मालक पुरुषोत्तम अग्रवाल गरीब आणि होतकरू मुलींसाठी शिवण मशीन मोफत देत असतात जेणेकरून त्यांचा आधार घेऊन भविष्यात मुली स्वतःच्या पायावर उभे राहतील व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतील याच नियोजनार्थ आमच्या किन्ही शाळेतील मुलींसाठी दहा शिवण मशीन चे वाटप परिसरातील किन्ही ,खंडाळा मोंढाळा कन्हाळे गावातील मुलींना मा माध्यमिक शिक्षणाधिकारी नितिन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख साहेब तसेच शिवणकाम विभागाच्या पर्यवेक्षिका आशा तडवी, भुसावळ पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील,खजिनदार प्रशांत सोनवणे,चेअरमन डॉ मधुकर चौधरी,सेक्रेटरी संजयभाऊ चौधरी संचालक प्रविण फिरके अरुण पाटील पत्रकार हर्षल पाटील शाळेचे मुख्याध्यापक डी पी साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमात शिक्षणाधिकारी यांनी आपल्या वाणीतून उपक्रमाची मनापासून स्तुती केली व ज्याप्रमाणे मुलींना शिवण मशीन वाटप करण्यात आले त्याप्रमाणे मुलांना सुध्दा प्राविण्य संपादन केल्या नंतर गरजू मुलांनाही मशीन वाटप कराव्यात ही अपेक्षा व्यक्त केली तर फाउंडेशन च्या पर्यवेक्षिका आशा तडवी यांनी शिवण मशीन विभागाचे कार्य व महत्व विशद केले
शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली आणि फौंडेशनचे मालक पुरुषोत्तम अग्रवाल व संपूर्ण टीम चे मनापासून आभार मानले तर पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील संचालक प्रशांत सोनवणे यांनीही आपले मनोदय व्यक्त करून समाधान व्यक्त केले.
शेवटी शाळेचे पर्यवेक्षक डी सी बाविस्कर यांनी अध्यक्षीय भाषणातून समता फौंडेशन आणि शाळा यांचा घनिष्ट संबंध असून दोघेही विद्द्यार्थी लाभासाठी कार्य करीत आहे व विकास साधत आहे असे स्पष्ट केले व गरीब गरजू मुलांना सुध्दा मोफत संगणक द्यावेत अशी विनंती केली कार्यक्रमासाठी फौंडेशनचे संगणक विभागाचे शिक्षक विजय तायडे सर, शिवणकाम विभागाच्या पर्यवेक्षिका तडवी मॕडम शिक्षिका सरोदे मॕडम शाळेतील तिन्ही विभागांतील सर्व शिक्षक बंधु-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आडावड हायस्कुलचे उपमुख्याध्यापक खुशाल कंखरे व अतुल पाटील सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे ए ढाके यांनी केले तर आभार सौ व्ही एन पाटील यांनी मानले.