शालेय जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत वीरा वॉरियर्स ग्रुप ला भरभरून यश

 

सचिन वाघे प्रतिनिधी

वर्धा :- जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा आणि तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन जिल्हा वर्धा यांच्या सयुक्त विद्यमाने 5,6 डिसेंबरला शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

त्या मध्ये जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धा पार पडल्या त्या मध्ये विरा वॉरियर्स ग्रुप हिंगणघाट ने घवघवीत यश प्राप्त केले त्या मधे 14 वर्षा खालील मुले या वयोगटात मानव मुकेश वानखेडे, आरुष विलास मनहोरे तर 14 वर्षा खालील मुली या वयोगटात प्राची राजेश मसराम, स्वरांगी गणेश घाटूर्ले तर 17 वर्षा खालील मुले या वयोगटात प्रज्वल महादेव देवतळे, साहील चंद्रशेखर तेलहांडे, 17 वर्षा खालील मुली या वयोगटा मधे विशाखा रामदास कंडे, श्रुती रविपाल खैरे, अदिती सुभाष गायकवाड आणि 19 वर्षा खालील मुले या वयोगटात संकेत मिलिंद नगराळे ,19 वर्षा खालील मुली या वयोगटात तेजल प्रमोद भोयर, छकुली रामकृष्ण पिसे, अनुष्का गणेश बलखंडे यांनी विजय प्राप्त केला. सर्वांनी प्रथम क्रमांक मिळऊन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे व यांची विभागीय स्तरावर निवड झाली.

व सर्व खेळाडू होणाऱ्या विभागीय तायक्वांडो स्पर्धेत वर्धा जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे। मुख्य पंच म्हणून मा. श्री श्याम खेमसकर सर( जिल्हा सचिव -तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन वर्धा) यांनी कार्यभार सभाळला.

मोलाचे मार्गदर्शन मुख्य प्रशिक्षक- रोहित राऊत सर यानी केले, प्रशिक्षक, गौरव खिराळे, भूषण वाठोरे, चेतन दहिवलकर, विशाल मडावी, हर्ष मून, कशिश खैरे, वैष्णवी पिसे, लक्ष्मी धनफोले, सदस्य. रोहित खैरकर, यश झाडे, मयूर नगराळे व गौरी पेटकर, यांनी अभिनंदन केले.

तसेच खेळाडूंनी यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले .

Leave a Comment