शहरात नावापुरतीच बंदी

 

सचिन वाघे वर्धा जिल्हा प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वर्ध्याच्या जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या ३६ तासाचे संचारबंदी दरम्यान हिंगणघाट शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातही संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यात यावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील दिसुन येत होते.
मार्च महिण्यातील येणाऱ्या सर्वच शनिवार रात्री ८ वाजेपासून तर सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत ३६ तासांचा संचारबन्दी आदेश जिल्हाप्रशासनाने दिला आहे.
मात्र संचारबन्दी दरम्यान हिंगणघाट शहरातील नागरिक रस्त्यावरच असल्याचे दिसुन आले.
एस टी महामंडळाची आन्तरजिल्हा बससेवा बंद होती,परंतु नागपुर तसेच इतर ठिकाणावरुन येणाऱ्या काही बसेस सुरु असल्याने हिंगणघाट बसस्थानकावर प्रवाश्यांची वर्दळ दिसुन आली.
महत्वाचे म्हणजे एसटीची सेवा,पेट्रोलपंपसुद्धा बंद ठेवण्यात आले,परंतु जवळपासच्या ग्रामीण भागात वाहतुक करीत ऑटोरिक्षा चालक मात्र संधिचा फायदा घेत अडल्यानडल्या प्रवाशांची लुट करण्यात व्यस्त होते.पोलिसांचा आशीर्वाद प्राप्तअसल्याने ही ऑटोरिक्षासेवा अविरतपणे सुरुच दिसली.
अवैध दारूविक्रि,अंमली पदार्थाची अवैधविक्री यासह वरळीमटक्याची लेनदेन सुरूच होती.
उपविभागिय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांचेशी संपर्क साधला असता जिल्ह्यात आरोग्यसेवा,औषधीविक्री याशिवाय दुसरी कोणतीही दुकाने किंवा आस्थापना सुरू न ठेवण्याचे स्पष्ट आदेश असल्याचे सांगितले.
महसुल कर्मचारी, पालिकापथकाने तसेच पोलिस विभाग संचारबन्दीदरम्यान संयुक्तरित्या कारवाई करतांना दिसुन आले.
काल रात्री ८ वाजेपासुनच पासून शहरात मांसाहारविक्रेत्यांसह सर्व विक्रेत्यांनासुद्धा आपआपली दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले.यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याने शहरातील दवाखाने,औषधी दुकाने इत्यादि सुरु होती.

Leave a Comment