शंभर अनाथ मुलांची माऊली हस्ताक्षर कलावंत विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेडे

अकोला जिल्ह्यातील आकोट तालुका व एदलापुर गावचे सामाजिक कार्यकर्ते व संस्थापक अध्यक्ष आश्रय ध्यान फाउंडेशन एदलापुर येथील हस्ताक्षर कलावंत विनायक धांडे हे गेल्या आनेक वर्षापासून तांदूळ व तिळावर हस्तकला करत सामाजिक बांधिलकी म्हणून आदिवासी भागातील,आदिवासी,अनाथ, निराधार, दिव्यांग, वृद्ध,यांची सेवा करत आहे.
जित अनाथ तिथ शाळा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून ते गेल्या अनेक वर्षापासून गावोगावी,अतिदुर्गम डोंगरी भागात जाऊन अनाथ बालकंना तसेच आदिवासी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ते करत आहेत व त्यांना शिक्षण देत आहेत.
हे कार्य करत असतात त्यांना अनेक दानशूर,तसेच समाजाप्रती आदर असणार्‍या व्यक्तींनी त्यांना मदत केली असता त्यांनी अनाथांच्या शिक्षण,कपडे,अन्न यावरती खर्च केला आहे.
त्यांच्या याच समाजा प्रती तळमळीच्या कार्याची दखल घेऊन मा.राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम व मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यंनी दखल घेतली होती व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विनायक धांडे यांना गौरवण्यात आले होते.तसेच या वेळी मा. राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या सर्व कार्याची माहिती जाणून घेऊन त्यांना सेवाभावी संस्था किंवा फाउंडेशन ची स्थापना करण्यास सांगितली होती,त्याचनुसार त्यांनी लगेच आश्रय ध्यान फाउंडेशनची स्थापना केली व त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून खास करून अनाथ,निराधारांसाठी अविरत कार्य करीत आहे.कोरोनाच्या जागतिक महामारी मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःच्या घराला कुलूप लावून जिवाची पर्वा न करता ज्या वस्तीवर, मुले असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना शिक्षणाचे ज्ञानदानाचे धडे दिले.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन नाम फाउंडेशन चे सामाजिक कार्यकर्ते व सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी त्यांचा सन्मान केला आहे.तसेच समाजसेवक विनायक काशीराम धांडे यांचे सिनेअभिनेते सयाजीराव
शिंदे यांनी कौतुक करीत,नुकत्याच पार पडलेल्या एका सामाजिक कार्यक्रमात भेटीदरम्यान धांडेच्या सर्वच सामाजिक कार्याचे अवलोकन करताना सामान्यांतून असामान्य कार्य करणारा आणि निराधार, निराश्रीत अनाथ बालकांसाठी ऊन, वारा आणि पावसातही जीवाची पर्वा न करता
अनाथ तिथेच शाळा भरवून अनाथांना शिक्षण देऊन पाढीवरून मायेचा हात फिरवणारे धांडे यांचे कौतुक केले आहे.
तसेच या आधीही स्वर्गीय अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी ही त्यांच्या कार्याबद्दल विनायक धांडे यांची प्रशांसना केली होती.
एवढेच नाही तर विनायक धांडे हे तांदूळ व तिळावरील कलाकृती बाबत हस्ताक्षर कलावंत असून त्यांनी एकाच तीळाच्या दाण्यावरती भारताचे संपूर्ण राष्ट्रगीत लिहिलेले आहे. त्याबद्दल मा.राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम व मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते.
तसेच या कार्याची दखल पंतप्रधान कार्यालयानी घेतलेली असून येत्या मे २०२२ मध्ये विनायक धांडे यांची भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची भेट होणार असून, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे व त्यांनी केलेल्या तिळावरील व तांदळाच्या दाण्यावरील कलाकृती ते स्वतः पाहणार आहे.

Leave a Comment