ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर शहरातील स्थानिक पत्रकाराला सहायक पोलीस निरीक्षकाची शिवीगाळ : शहरातील जुना बसस्थानक परिसरातील पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेते दिपक बरकसे हे रोजनिशी प्रमाणे आज (ता.२७) रोजी त्यांचे वृत्तपत्र विक्रीचे काम करीत होते. कडकडीत उन्हात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दीपक यांनी पाणी पिण्यासाठी मास्क बाजूला काढला, यावेळी पेट्रोलिंग दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे हे आपल्या लावाजम्यासह त्याठिकाणी आले. यावेळी त्यांनी दिपक यांना कंबरेखालच्या (अश्लील) भाषेत शिवीगाळ केली. केळे शिवीगाळ करत असताना सोबत असलेल्या इतर पोलीस कर्मचारी यांनी दिपकभाऊ एक जबाबदार नागरिक तथा पत्रकार आहेत असे सन्मानीय केळे यांना सांगितले मात्र केळे हे कुठल्याही कर्मचारी यांचे म्हणणे ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते…
सहायक पोलीस निरीक्षक केळे यांनी वृत्तपत्रविक्रेते/पत्रकार यांना केलेल्या दमबाजीमुळे वैजापूरात लोकशाही की हुकूमशाही ? असा प्रश्न उपस्थितीत झाला. शिवाय पत्रकार बांधवाना केळे यांच्याकडून अशा प्रकारची वागणूक तर सामान्यांना कशी वागणूक मिळत असेल ? हा मोठा गंभीर प्रश्न उपस्थितीत होत आहे. आज घडलेल्या घटनेचा वैजापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने जाहीर निषेध… तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रविवारी निषेध नोंदवण्यात आला.संबधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्रकार संघाचे सचिव मकरंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव,गणेश पैठणकर यांनी निवेदन स्वीकारले. संघाची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी विजय गायकवाड, भानुदास धामणे,प्रशांत त्रिभुवन, शांताराम मगर,काकासाहेब लव्हाळे,फैसल पटेल,बाबासाहेब धुमाळ,सुनील त्रिभुवन, नितीन थोरात,शैलेंद्र खैरमोडे,सय्यद मन्सूर अली,शेख रियजुद्दीन,अमोल राजपूत,विलास म्हस्के,प्रा.आबासाहेब कसबे,डॉ हरेष साबणे,विशाल त्रिभुवन, दीपक बरकासे, दीपक थोरे,संदीप गायके, सचिन कुमावत,किरण राजपूत,शेख अजहर, मिलिंद वाघमारे,ऋषी जुंधारे उपस्थित होते.