ऋषी जुंधारे,वैजापूर
आज वैजापुर पंचायत समिती येथे आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पाणी फाऊंडेशन गाव समृद्ध स्पर्धा 2020-21आढावा बैठक संपन्न झाली.
.पाणी फाऊंडेशन आयोजीत समृद्ध गाव स्पर्धा 2020- 21 या आढावा बैठकीचा शुभारंभ आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांनी दीपप्रज्वलनाने केले. या बैठकीस मार्गदर्शन करतांना विधानसभा मतदार संघातील मंजुर करून आणलेल्या जलसंधारण अंतर्गत केटीवेअर, कोल्हापुरी, सिमेंट बंधारे, माती बंधारे असे विविध मंजुर केलेली काम व प्रस्तावित कामाची माहिती दिली. या स्पर्धेत तालुक्यातील 16 गावानी सहभाग घेतलेला असुन सर्व शेतकर्यांनी गावागावातील गटतट सोडत एकत्र येऊन गाव चांगल्या प्रकारे पाणी फाऊंडेशन स्पर्धे अंतर्गत सुजलाम सुफलाम करा असे शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पाणी फाऊंडेशन अंतर्गत पहिल्या टप्प्यांत काही झालेल्या गावाना भेटी दिल्या होत्या त्यावेळचे सुत्र व आताचे पाणी फाऊंडेशनचे सुत्र यात खुप मोठा बदल झाला असुन त्याचे नियोजन वेगवगळ्या पध्दतीने करण्यात येत असुन पाऊस गावात किती पडला, रेनगेज बसविणे, पाऊस नोंदी ठेवणे, विहीरीचे पाणी मोजणे, पाण्याची पातळी वर्षातून 4 वेळा मोजणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश केला आहे. व सर्व शेतकर्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावे अशा सुचना दिल्या.
.
यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो वैद्य साहेब, डॉ पोळ साहेब, उपविभागीय अधिकारी आहेर साहेब, तहसीलदार गायकवाड साहेब, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, गटविकास अधिकारी मोकाटे साहेब, उपसभापती राजेंद्र पा मगर, तालुका कृषी अधिकारी कुलकर्णी साहेब, नायब तहसीलदार निखिल धुळधर साहेब, सुरेश राऊत, दिपक तंगे,प्रल्हाद अडसूळ सर्व कृषी सहायक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा सेविका,मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच शेतकरी उपस्थित होते.