वैजापूर तालुक्यातील २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून,ही कामे लवकरच सुरू होणार आहेत,अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी दिली.
प्रशासकीय स्तरावर या रस्त्यांच्या कामकाजाबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे मागील आठवड्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सन २०२०-२१च्या तिसऱ्या टप्प्यातील वैजापूर तालुक्यातील विविध रस्त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार तालुक्यातील१४गावांतील जवळपास२३कि. मी लांबीच्या रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यांची कामे करतांना यादी क्रमांकनुसारच प्राधान्य दिले जाणार असल्याचे डॉ दिनेश परदेशी यांनी सांगितले. या रस्त्यांमुळे तालुक्याच्या विकास कामास मोठा हातभार लागणार असल्याने परदेशी यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले.

Leave a Comment