वैजापूर तालुका पोलीस पाटील कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी- राजू आहेर पाटील

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी

आज वैजापूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वैजापूर तालुका पोलीस पाटील कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी मकरमतपुर वाडी येथील राजु आहेर पाटिल तसेच तालुका उपाध्यक्ष पदी अनिल धिवर पाटिल बेलगाव यांची निवड झाली.त्या अनुषंगाने या दोन्हीही निवडीबद्दल वैजापुर येथे ठक्कर मार्केटमध्ये समता परीषद च्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी समता परिषदेचे ज्येष्ठ जिल्हा निमंत्रक आबासाहेब जेजुरकर समता परिषद जिल्हा संघटक जगन्नाथ गायकवाड समता परिषद तालुका सरचिटणीस साहेबराव पडवळ शाहीर अशोक बागुल तसेच नगरसेवक स्वप्निल जेजुरकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बद्री अण्णा गायकवाड ,दिगंबर वाघचौरे बाळासाहेब शेवाळे वाल्मीक पठारे पत्रकार दिगंबर भाऊ अण्णा धारबळे आदींची उपस्थिती होती याप्रसंगी सर्वांनी पुढील वाटचालीसाठी दोन्हीही पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment