विष प्राशन करून शेतकऱ्यांची कर्जापायी आत्महत्या . ।सावखेड तेजन येथील हृदयद्रावक घटना –

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्भवली यामध्ये हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झाली त्यांचे नुसकान झाले !अनेकांनी सोयाबीन कपाशी यांच्या पिकावर खाजगी सावकारांची असतील किंवा बँकेकडून कर्ज घेतले होते !व झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुसकान पाहून हे कर्ज कसे फेडायचे हाच विचार अनेक शेतकऱ्यांच्या मनात येत असतो !परंतु काही शेतकरी हे मनात भलताच विचार करून आत्महत्येचा मार्ग निवडतात अशीच एक घटना ‘सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन या गावात घडली !सावखेड तेजन येथील श्रीराम मांटे यांच्याकडे आठ एकर शेती आहे त्यांना दोन मुले व एक मुलगी असून तिघेही विवाहित आहे ‘त्यांचा मुलगा संजय मांडे याच्या नावावर अडीच एकर शेती असून त्याला 9 वर्षांचा लहान मुलगा आहे अडीच एकर शेतामध्ये संजय आपल्या परिवाराचा गाडा काबाडकष्ट करून ओढत होता !संजयने ग्रामीण बँकेत सिंदखेडराजा शाखेतून तीन लाख रुपये तर ‘बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे 70 हजार रुपये व महिंद्रा फायनान्स चे दीड लाख रुपये असे एकूण सुमारे पाच लाख 70 हजार रुपये कर्ज संजय वर झाले होते !कर्जाची परतफेड करायची म्हणून संजयने सोयाबीन व कपाशीची लागवड केली होती सुरवातीला पिकाची परिस्थिती चांगली होती मात्र अतिवृष्टीमुळे संजय च्या स्वप्नांचा चुराडा झाला मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली त्यामुळे त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर संजयला दिसू लागला .कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत तो बेचैन राहायचा अशातच त्यांनी शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले संजय ला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परिस्थिती हाताबाहेर जात असतांना पाहून संजयला तेथून जालना येथे दवाखान्यात नेण्यात आले परंतु उपचार सुरू असताना 21 नोव्हेंबर ला संजय चे निधन झालेशेव विच्छेदन केल्यानंतर संजय वर सावखेड तेजन येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले ।संजय च्या पाठीमागे पत्नी मुलगा भाऊ आई-वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे संजयच्या जाण्यामुळे परिसरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे !

Leave a Comment