विवेकानंद आश्रमात स्वामी शुकदास महाराज जयंती उत्सव संपन्न : !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील विवेकानंद आश्रमात कार्तिक वैद्य त्रयोदशीला कर्म योगि संत .प .पू . शुकदास महाराज श्रीच्या जयंती उत्सव सोशल डिस्टिंग चे पालन करून संपन्न झाला .या वर्षी 12 डिसेंबरला शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून अत्यंत मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत परंतु भक्तिभावाने व तेवढ्याच उत्साहाने परमपुज्य महाराजश्री चा जयंती उत्सव साजरा केला गेला ‘विवेकानंद आश्रमाच्या कार्यकारी मंडळाने भाविकांना अगोदरच घरीच राहून प्रतिमेचे पूजन व दर्शन करण्याची विनंती केली होती .त्यानुसार लोकांनी आश्रमात गर्दी केली नाही .सकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात मंत्रघोष व काकड आरती ने सुरुवात झाली ।सहा वाजता हरिहर तीर्थावर महाआरती आठ ते नऊ वाजता ग्रामसफाई व परिसर स्वच्छता करण्यात आली .नऊ वाजता हभप येवले शास्त्री महाराजांचे अनुभूती ग्रंथावर प्रवचन तसेच विवेकानंद आश्रमाच्या गायन वृंदा चा भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम झाला ‘सकाळी दहा वाजता परमपूज्य संत शुकदास महाराज श्री च्या समाधीस्थळाचे पूजन करण्यात आले .दुपारी एक वाजता विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे कार्यकारी मंडळातील सदस्याच्या हस्ते भूमिपूजन झाले ‘दुपारी दोन वाजता उत्सव समितीची सभा संपन्न झाली या सभेत लोक डाऊन काळात संस्थेने सार्वजनिक हितार्थ केलेली व शासनाच्या आरोग्य विभागाला सहकार्य झालेली कामे तसेच शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेने केलेली तयारी तसेच कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारकासाठी भविष्यात करावयाच्या कामासंबंधी चर्चा करण्यात आली ।परम पूज्य महाराज श्रीच्या समाधीस्थळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी ।व हरिहर तीर्थ वरील गार्डन व गोशाळेत गुरांचा चारा साठविण्यासाठी नवीन गोडाऊन ची निर्मिती करणे विषयी चर्चा झाली . ।विवेकानंद जयंती उत्सव यावर्षी ‘ 2 ‘ 3 ‘ व ४फेब्रुवारी 20 21 पौष वैदय पंचमी ‘ती सप्तमीला संपन्न होणार आहे .तसेच शासनाने परवानगी दिल्यास शासनाच्या आदेशाचे पालन करून संपूर्ण शासनाला सहकार्य करण्याचे या सभेत ठरवण्यात आले ।सायंकाळी भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला ।

Leave a Comment