विज बिलाची सक्तीची वसुली कराल तर स्वाभिमानी स्वस्त बसणार नाही. : गोपाल तायडे

 

 

आयुषी दुबे शेगाव

कोविड 19 (कोरोना ) वाढत्या प्रादुर्भागामुळे सरकारने
लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसामान्य जनता सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत तीन महीने कुठल्या ही कामावर न जाता घरीच राहली. सरकारने आव्हान केल्या मुळे सर्व सामान्यांची जबाबदारी मायबाप म्हणून सरकारची होती. तिथे व्यवस्था करण्यात सरकार कमी पडली. कोनत्याच कामावर न गेल्यामुळे सर्वसामान्य जनता ही आर्थिक संकटात सापडली आहे. अश्यातच विद्युत मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिला मध्ये कोणतीच सूट मिळणार नाही असे वक्तव्य मंगळवारी
प्रसारमाध्यमाशी बोलताना केले. आगोदर वीज बिला मध्ये सूट मिळणार असे आश्वासन विद्युत मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु घुमजावं करीत सरकारने वीज बिल माफ होणार नाही अशी भूमिका घेगली आहे. कोरोना काळात जनतेला घरी बसून. जनतेने वापरलेल्या वीज बिलाची सक्तीची वसुली करण्याचे ठरवले आहे परंतु
राज्य सरकारने वीज बिल माफ करून सर्वसामान्य व शेतककरी जनतेला दिलासा द्यावा. अंन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकरी, शेतमजुर, कामगार व सर्वसामान्य जनता सह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Comment