विजयराज शिंदे यांच्या “घागर मोर्च्याच्या” इशाऱ्याने बारा गाव पाणीपुरवठा योजना सुरू होणार

 

पाणीपुरवठा तत्त्काळ सुरु करून घागर मोर्च्या काढण्यास परावृत्त करण्या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-
दिवाळी सारखा महत्वाचा सण तोंडावर असतांना सुद्धा मोताळा तालुक्यातील रोहीनखेड़-राजुर सह बारा गाव पाणीपुरवठा योजना गेल्या आठ महिन्यापासुन बंद असलेली पाणी पुरवठा योजना तत्त्काळ सुरु अन्यथा “घागर मोर्च्या” आणू अशी आग्रही मागणी व इशारा मा.आमदार विजयराज शिंदे यांनी ४/११/२०२० रोजी जिल्हाधिकारी व मजिप्र कार्यकारी अभियंता यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केला होता.
हि पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकड़े विविध निवेदने ,बैठका होऊन सुद्धा प्रशासकीय अडचणी व इच्छाशक्ति अभावी योजना सुरु झाली नव्हती. ग्रामस्थांना धरणात पाणी साठा उपलब्ध असताना सुद्धा पाणी मिळत नव्हते . महिलांना शेतातील कामे करून दूरवरुण पाणी आणावे लागत होते.अनेक गावांत दूषित पाणी पिल्याने रोग राई पसरन्यास सुरवात झालेली होती ही गंभीर बाब मा.विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून देत लेखी निवेदन देऊन सदर योजना तत्त्काळ चालू करा अन्यथा घागर मोर्च्याचा इशारा भाजपाच्या वतीने दिला होता.या इशाऱ्या नंतर मात्र धास्तावलेल्या प्रशासनाने सकारात्मक दिशेने प्रयत्न सुरु केले.

मा.जिल्हाधिकारी यांनी सदर निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता यांना तत्त्काळ तोंडी व लेखी सूचना देऊन
“विलंब न करता संबंधित गावांत तातडीने पाणीपुरवठा करावा तसेच होऊ घातलेला “घागर मोर्च्या” काढण्यापासून संबंधितांना परावृत्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी मजिप्रा ला दिले आहे व याबाबत मा.आमदार विजयराज शिंदे यांना कळविले आहे.

महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे उप कार्यकारी अभियंता श्री.भिलवाड़े यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता दिवाळीपूर्वीच योजनेत सहभागी सर्वच्या सह गावाना योजना कार्यान्वित करून पानी पुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती दिली आहे.
त्यामुळे आता रोहीणखेड़ राजुर सह बारा गाव पाणी पुरवठा योजना सुरु होऊन ग्रामस्थ व खास करून महिलांना दिवाळीची चांगली भेट मिळणार असल्याची भावना व आनंद व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment