वाघोदे खुर्द ता.रावेर येथे अतिक्रमण ग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन मैदानात

 

 

 

भीम आर्मी भारत एकत मिशनची रावेरला धडक पिडीत कुटुंबाचे पुनर्वसनाचे तहसीलदारांनी ग्रामसेवकांना दिले तात्काळ आदेश

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

रावेर “भिम आर्मी” भारत एकता मिशन संस्थापक प्रमुख,बहुजन हृदय सम्राट भाई चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यनेतृत्वावर विश्वास ठेवून.. “भिम आर्मी” भारत एकता मिशन, जळगांव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे यांचे नेतृत्वात नुकतीच वाघोदे खुर्द ता.रावेर येथे अतिक्रमण ग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेकडो पदाधिकारी यांनी भेट दिली असता तहसिलदारांनी लागलीच दखल घेऊन पिडीत कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत आज दि.१९ जुलै रोजी “भिम आर्मी” जळगांव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे हे आपल्या स्वतःच्या वाहनात पीडित कुटुंबाला घेऊन रावेर तहसील कार्यालय येथे धडकले असता……पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत द्यावी अश्या स्वरूपाचे निवेदन दिले असता……मा.तहसीलदार मॅडम यांनी घटनेचे गंभीर्य बघून तेथे उपस्थित वाघोदे खु. गावचे ग्रामसेवक यांना नोटिस स्थगित करून पीडितांना न्याय देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायत हद्दीतील जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले व सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या . “भिम आर्मी” भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा युनिट ने तेथील हुकूमशाही ग्रामपंचायत प्रशासनाचा कुटील डाव हाणून पाडला आहे याप्रसंगी शेकडो पदाधिकारी हजर होते. अशी माहिती “भिम आर्मी” भारत एकता मिशनचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्धजी खरे यांनी दिली आहे…

Leave a Comment