सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी
वर्धा :- जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्यांचे मागील तिन वर्षापासून मासिक वेतनात कमालीची अनियमितता होत असुन त्यांना देय असलेली कालबद्ध पदोन्नती ची थकबाकी, वैद्यकीय बिले मिळालेली नसल्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमलडे आहे. याबाबत विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर,जिल्हा शाखा वर्धा च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना वारंवार पाठपुरावा करूनही हा मुद्दा ऐरणीवर राहिल्याने शेवटी संघटनेने जिल्हाधिकारी वर्धा यांना एक महिन्यापूर्वी आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी दिनांक 21-10-22 ला निषेधात्मक काळ्या फिती लावून काळी दिवाळी साजरी करणार व दिनांक 1-11-22 पासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूकीची कामे वगळता इतर सर्व शासकीय कामात असहकार आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची नोटीस विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा वर्धा चे जिल्हाध्यक्ष संजय भोंग, उपाध्यक्ष योगेश निकम, महम्मद शफी, सचिव दिलीप मुडे, सहसचिव रामकृष्ण सायरे, कोषाध्यक्ष वासुदेव डेहने यांच्या स्वाक्षरीने देण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ झामरे, माजी सचिव श्याम चंदनखेडे, संजय नासरे, गजानन मसाये, देविदास हेमने, गुलजार नकोरिया, एम एस घुले, मुरलीधर लवणकर, पि एम एकापुरे, ज्ञानेश्वर कापकर, मुक्ता किरपाल, धर्मेंद्र गायकवाड, तेजराम बागडे एम एम दुबे, संदीप हनुमंते, डि आर कुटे, आर एच पुनसे, कुमार बारसागडे, अरविंद तराळे, हरीश गाखरे मंडळ अधिकारी उपस्थित होते